nisarg maza mitra, nisarg apala sobati, nisarg vachava, paryavbanache rakshan, झाडांचा अपमृत्यू टाळा,
निसर्ग माझा मित्र
निसर्ग हा आपला खरा मित्र आहे. निसर्ग प्रत्येकाशी एकनिष्ठ राहतो. हे माणसासारखे आपले निष्ठा कधीही बदलत नाही. निसर्ग नेहमीच व्यापकपणे आणि आनंदाने आमच्याबरोबर भेटतो.
निसर्ग आपला सोबती !
आज वृक्षतोडीमुळे पक्षी व प्राण्यांची सावली हिरावली जात आहे. माणसाला जसा या वृक्षतोडीमुळे त्रास सहन करावा लागतो आहे. त्यापेक्षाही कितीतरी जास्त पक्ष्यांना त्रास होतो आहे. कावळा देखील काव - काव करीत म्हणतो आहे कि, अरे माणसा एक तरी झाड लाव, एक तरी झाड लाव.
तुकाराम महाराजाच्या मनन व चितनात वृक्ष, वेली व वनचर हे सगे सोयरे आहेत. मग त्यांच्यावर प्रहर का करता? आज पाऊस लांबला आहे. याचे कारण उघडेबोडके जंगल हाच आहे. निसर्गातील सौंदर्य सर्वांना स्फूर्ती, आनंद आणि चैतन्य देते. निसर्गाच्या सानिध्यात अपार सौख्याचा लाभ होतो.
शेतातून जाणारी एखादी पायवाट, पुढे तो औदुंबराचा वृक्ष व भर उन्हात त्या झाडाची सावली अंगावरुन हात फिरविल्या सारखे वाटते. खरोखरच निसर्गातील हे सौंदर्य जिवंत असते. व त्यातून मनुष्यप्राणी सुखावतो. मग विचार करा कि, झाडे, वेली हे आपल्या पूर्वजासारखे आहेत. मग त्यांचा मान राखायला नको काय?
निसर्ग वाचवा निसर्गाच्या
विरुद्ध वागू नका.
पर्यावरणाचे रक्षण
आपत्तीपासून संरक्षण
कोणतीही संकटे कधी सांगून येत नसतात. संकटे अनेक प्रकारची रूपे घेऊन येत असतात. कोल्हापूर-सांगलीचा प्रलयंकारी महापूर बघता बघता साऱ्या शिवारात व गावा-शहरात पसरला. लोकांची भंबेरी उडवून टाकली तरी नदीकाठी असणारी वस्ती व गावे यांनी आता समजून चालावे की, जून ते सप्टेंबर महिने आपली ‘घात मास’ आहेत.
पर्यावरणाचे रक्षण आपत्तीपासून संरक्षण |
मेघराजा नद्या, तळी, तलाव, ओढे सर्वकाही भरून टाकतो
पण आपल्या घरची ‘घागर’ रिती ठेवतो असा निसर्ग चमत्कार असतो. पण यात मेघराज्याचा दोष तो कोणता? अहो तो तर बरसणारच. तरीही हवा-पाणी-आग याची कोणी परीक्षा घेऊ नये, निसर्गाच्या आडवे येऊ नये, निसर्गाला आपल्या मार्गे जाऊ द्यावे. घरे, बांध, धरणे बांधताना याचा दहा वेळा विचार व्हावा व सुरक्षित
जागांचा आसरा शोधावा, पाहू या ! पुढील वर्षात याच ‘घातमासात’ आपण कसे वागतो ते?
झाडांचा अपमृत्यू टाळा.
सध्या जुनी जीर्ण झालेली झाडे बुंध्याला गिरमिटच्या साहाय्याने छिद्रे पाडून ती झाडे जीर्ण केली जात आहेत. त्यामुळे ही झाडे वाळू लागतात. त्यानंतर त्या झाडाला आग लावून ती झाडे तोडली जातात. त्यांच्याभोवती असणारी झाडे अशीच तोडली जातात. झाडांचे वय १०० पासून २०० पर्यंत असू शकते. त्यांचे जतन केले पाहिजे. व ही झाडे आपली महापुरुष समजून त्यांचे जतन केले पाहिजे.
वृक्षारोपणाचे महत्त्व सांगता सांगता जंगले उघडी बोडकी होऊ लागली. गावागावातल्या वनराया तोडून नष्ट केल्या जावू लागल्या. आज वड, पिंपळ, उंबर, बेल वगैरे झाडे दिसेनाशी झाले आहेत. त्यामुळे देवस्थानच्या आसपास असणारा पक्षांचा थवा पहावयास मिळत नाही.
त्यामुळे पशुपक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळेही डेरेदार झाडे तोडल्याने आज विसाव्याची सावलीच नाहीशी होत आहे. त्यामुळे वनविभागाने असे कृत्य करणाऱ्यांना जबर शिक्षा केली पाहिजे. व जीवसृष्टी वाचवली पाहिजे.
COMMENTS