--> पिंजऱ्यातील पोपट | MyselfEssay

पिंजऱ्यातील पोपट

पिंजऱ्यातील पोपट , pinjryatil popatache manogat in marathi

पिंजऱ्यातील पोपट 

pinjryatil popatache manogat in marathi



पिंजऱ्यातील पोपट




      एके दिवशी गंमतच झाली. पिंजऱ्यातील पोपट बाहेर आला आणि आम्ही त्याला शिकवलेल्या शब्दांपेक्षा वेगळेच काही बोलू लागला. तेव्हा आम्हा सर्वांना नवल वाटले आणि घरातली सारी माणसे त्याच्याभोवती जमली. 

 

      मी पिंजऱ्यातला पोपट. आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे. तुम्ही माणसे तुमच्या आनंदासाठी आम्हांला पकडता, घरी आणता आणि पिंजऱ्यात ठेवता. पण आम्हांला काय वाटत असेल, याचा विचार तुम्ही माणसे करत नाहीत. हेच बघा ना ! 

 

      पोपट सांगत होता, "हल्ली तुम्ही माझ्या पिंजऱ्याचे दार उघडे ठेवता. पण मी पिंजऱ्याबाहेर सहसा येत नाही. कारण वर्षानुवर्षे या पिंजऱ्यात राहिल्याने मला आता पिंजरा हेच आपले घर वाटू लागले आहे. बाहेरच्या जगाचे मला थोडेही आकर्षण राहिले नाही. 

 

      तुमच्याकडे येण्यापूर्वी मी माझ्या आईवडलांसह रानात मोकळे जीवन जगत होतो, त्यावेळी मी अगदी लहान होतो. 'कसे उडायचे' हेही मला अवगत नव्हते. आईवडील माझ्यासाठी खाऊ आणायला गेल्यावर मी झाडाच्या ढोलीत त्यांची वाट पाहत राहत असे. 

 

      याच प्रचंड झाडाच्या ढोलीमध्ये इतर पोपटांची वस्ती होती. त्यामुळे त्यांच्या छोट्यांबरोबर खेळण्यात, उडण्याचा सराव करण्यात माझा वेळ किती छान जात असे! अचानक तो घातवार उजाडला. एका पक्षिविक्याने मला पकडले. त्याच्याकडून मी तुमच्या घरी आलो. तुम्ही पहिल्या दिवसापासून माझे कौतुक करत आहात. मला खाऊपिउ घालत आहात. लाडाने माझ्याशी बोलत आहात. तेव्हा तुमच्या व जगाच्या दृष्टीने मी येथे सुखी आहे. पण खरे पाहता, मी सुखी नाही. कारण माझे स्वातंत्र्य मी कायमचे गमावले आहे.

 

       या घरात आज अनेक वर्षे मला पिंजऱ्यात ठेवलेले आहे. ही घरातील माणसे माझ्यावर खूप प्रेम करतात. मला आवडणारे पदार्थ खायला देतात. माझ्यासाठी खास पेरू आणतात. माझे नेहमी कौतुक करतात. येणाऱ्या पाहुण्यांपुढे माझे प्रदर्शन करतात. मला नवे शब्द बोलायला शिकवतात. पण मला खरोखरीच काय हवे आहे, ते हे लोक समजून घेत नाहीत. 

 

       मला स्वातंत्र्य हवे आहे. अगदी सोन्याचा पिंजरा असला, तरी तो मला नकोसा वाटतो. मला रानात मुक्तपणे विहार करायचा आहे. माझ्या भाऊबंदांबरोबर मला मोकळ्या आकाशात उडायचे आहे. मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो, तुम्ही माणसे स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी झगडता, युद्धही करता; मग आमचे स्वातंत्र्य मात्र कसे हिरावून घेता ?

  

       आकाशात मी केव्हाच उंच भरारी मारली नाही. आता तुम्ही मला मुक्त केलेत, तरी स्वतंत्र जगात मी जगूच शकणार नाही. आता माझे एकच सांगणे आहे की, माझ्या मृत्यूनंतर हा पिंजरा फेकून दया. दुसऱ्या कोणालाही कदापिही गुलाम करू नका.

 

    मला आता या पिंजऱ्यातून मुक्त करा. मी तुम्हांला रोज भेटायला येईन.

 


COMMENTS

Name

Bharat,4,English,34,Hindi,36,Jag Duniya,6,Marathi,24,Moulik Vichar,8,
ltr
item
MyselfEssay: पिंजऱ्यातील पोपट
पिंजऱ्यातील पोपट
पिंजऱ्यातील पोपट , pinjryatil popatache manogat in marathi
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi2dYY1E99kO-r2smPOptqdXigtUJvz4Z-_NKlEegifQDFn-dfHR4DhQ665ypWehc2NJJsfoEvnO1UhNnHS_ttWfoeruLjSmgWGgKKbdIzXJestTn6o2L03Hb7be26zekQHcF3E4ukLXSQq/s640/pinjryatil+popatache+manogat+in+marathi.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi2dYY1E99kO-r2smPOptqdXigtUJvz4Z-_NKlEegifQDFn-dfHR4DhQ665ypWehc2NJJsfoEvnO1UhNnHS_ttWfoeruLjSmgWGgKKbdIzXJestTn6o2L03Hb7be26zekQHcF3E4ukLXSQq/s72-c/pinjryatil+popatache+manogat+in+marathi.jpg
MyselfEssay
https://www.myselfessay.com/2020/05/pinjryatil-popatache-manogat-in-marathi.html
https://www.myselfessay.com/
https://www.myselfessay.com/
https://www.myselfessay.com/2020/05/pinjryatil-popatache-manogat-in-marathi.html
true
3476857798770109658
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content